महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर,

आपले स्वागत करीत आहे

सुस्वागतम

महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर जिल्हयाला विविध क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे....
महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी, नागपुर
श्री. सचिन कुर्वे

महाराष्ट्रातील उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर जिल्हयाला विविध क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याच प्रमाणे क्रीडा क्षेत्रात सुध्दा नागपूर जिल्हयाचा नांव लोैकीक राष्ट्रीयस्तरावर होत आहे. याच अनुषंगाने क्रीडा विभागाने क्रीडा पुस्तिका, स्पर्धा आयोजन कार्यक्रम वेबसाइट व्दारा उपलब्ध करुन दिली ही नक्कीच चांगली बाब आहे. या संकेत स्थळावर नागपूर जिल्हयातील क्रीडा संस्कृती , क्रीडा संबंधी योजना, क्रीडा स्पर्धा इत्यादी बाबतची महत्वपूर्ण माहीती समाविष्ट करण्यात आलेली आहे.मला खात्री आहे की, हे संकेतस्थळ सर्व क्रीडापटू क्रीडातज्ञ, विशेषत: खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी जुळलेल्या सर्व व्यक्तीना अत्यंत उपयुक्त ठरेल. तसेच जिल्हयातील क्रीडा क्षेत्रा करीता नविन संकल्पना, वाव मिळेल अशी अपेक्षा आहे. सन २०१६-१७ हया वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धात सहभागी होणा-या सर्व खेळाडूंना हार्दीक शुभेच्छा.

जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपुर
श्री. अविनाश दे. पुंड

महाराष्ट्रात भौगोलिक तसेच आर्थिक स्थिती नुसार नागपूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील नव्या नव्या बदलांना हाताळण्या करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर सज्ज होत आहे. या सुविधांमध्ये वेळोवेळी आवश्यक्तेनुसार बदल व सुधारणा करण्यात येणार आहे. क्रीडा प्रेमी व खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधीत सर्व मान्यवरांचे अभिप्राय या करिता मार्गदर्शक ठरणार आहेत. मला खात्री आहे की, हे संकेत स्थळ सर्वांसाठी विशेषतः खेळाडू, शिक्षकांसाठी व संघटक, संघटना यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, तसेच नागपूरच्या क्रीडा क्षेत्रावर प्रकाशझोत येईल अशी आशा आहे.या website मध्ये काही त्रुट्या असल्यास कृपया कार्यालयाशी संपर्क साधावा.


१-दिनांक ११/०७/२०१७ रोजी दुपारी :-२.०० वाजता -सर्व तालुका क्रीडा सचिवांची सभा.

२-दिनांक १२/०७/२०१७ रोजी दुपारी :-३.०० वाजता -सर्व जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष/ सचिव यांची सभा.

३-दिनांक १४/०७/२०१७ रोजी दुपारी :-३.०० मनपा क्षेत्रातील शाळा /कॉलेज मधील शारीरिक शिक्षकांची सभा.

online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam online_exam
website hit counter